आधुनिक दे मिलेनियल्सचे शानदार भारतीय लग्न

Personal loans for weddings

डिलॉइट इंडिया आणि रिटेलर असोसिएशन ऑफ इंडिया यांनी एक अहवाल जारी केले, ज्याचे नांव ‘ट्रेंड-सेटिंग मिलेनियल्स: उपभोक्ता परिस्थितीची नवीन परिभाषा करणें’ असे आहे. या अहवालानुसार मिलेनियल्सच्या भारतात सक्रिय कर्मचार्यांची संख्या अंदाजे ४७% आहे. मिलेनियल्सच्या उत्पन्नाचा एक मोठा भाग दैनंदिन जगण्यात खर्च होतो.

वाढीव उत्पन्न खालीलप्रमाणें खर्च केले जाते-

  1. १) मनोरंजन आणि जेवण- ३२.७%
  2. २) कपडे आणि वस्तू- २१.४%
  3. ३) इलेक्ट्रोनिक्स – ११.२%

याखेरीज, ते आपल्या बॅंक खात्यातील रक्कम वाचवण्यापेक्षा खर्च करण्यात विश्वास करतात, कारण त्यांच्या बचत खात्यात त्यांच्या उत्पन्नाचा केवळ १०% च राहतो, ज्यामध्ये वाढीव उत्पन्न सामील आहे.

(स्त्रोत: livemint)

या अहवालाने मॉर्डनडे मिलेनियल्सच्या खर्च करण्याच्या सवयींना वास्तविकतेत आणले आहे. आजचा तरुण महत्त्वाकांक्षी आहे. त्याला सगळे काही हवे आहे आणि तो खर्च करण्यात मागेपुढे पाहत नाही. गोष्ट लग्नाची असली, तर त्यांच्या आकांक्षा त्यांना एका नवीन उंचीकडे घेऊन जातात. बदलते ट्रेंडस पाहता, मिलेनियल्सना आपल्याकरिता एक शानदार लग्न झालेले हवे असते. एका शानदार भारतीय लग्नाची कल्पना आकर्षक आहे, कारण ते मिलेनियल्सना एक संस्मरणीय अनुभव देण्यास मदत करते. लग्न जीवनात एकदाच होते आणि ते याला संस्मरणीय बनवण्यात कोणताच कसूर सोडत नाहीत. लग्नात जेवण, आहेर, पाहुण्यांच्या राहण्याची सोय, इवेंट मैनेजमेंट यासारखे अनेक खर्च सामील आहेत. एवढ्या अवाढव्य खर्चांच्या समवेत, वैय्यक्तिक बचत होऊ शकत नाही. अनेकदा लग्नाच्या व्यवस्था पूर्ण करतांना बचत केलेला पैसाही संपतो. मोठ्या आणि शानदार लग्नाच्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मिलेनियल्स सामान्यपणें कर्ज घेतात.

 

लग्नांसाठी वैय्यक्तिक कर्ज-

प्रमुख बॅंका आणि बिगर-बैंकिंग वित्तीय कंपन्या वैय्यक्तिक कर्जाचा प्रस्ताव ठेवतात, ज्याला लग्नाचे खर्च पूर्ण करण्यासाठी वापरले जाऊ शकते. या कर्जांना तारण लागत नाही. याशिवाय, वैय्यक्तिक कर्ज सहजरित्या उपलब्ध आहेत आणि यासाठी लागणार्‍या दस्तऐवजांची प्रक्रियापण छोटी आहे. वैय्यक्तिक कर्ज मिळवणे सोपे असल्यामुळे, मिलेनियल्ससाठी हा एक आवडीचा पर्याय आहे.

 

वैय्यक्तिक कर्जाचे फायदे-

वैय्यक्तिक कर्जाचे फायदे खालीलप्रमाणें आहेत:

  • या कर्जांना तारण लागत नसल्यामुळे, कोणीही कर्ज घेऊ शकते.
  • परतफेड ५ वर्षांच्या कालावधीत केली जाऊ शकते, ज्यामुळे परतफेड सोपी होऊन जाते.
  • कमी वेळेत कर्ज ऑनलाइनही मिळवता येते.
  • कर्ज मिळवण्यासाठी पात्रतेचे निकष खूप साधारण आहेत, जे जवळपास प्रत्येक कर्जदारासाठी उपयुक्त आहेत.

 

लक्षात ठेवण्यासारखे नियम-

लग्नासाठी पैसा जमवण्याकरिता कर्ज एक चांगला मार्ग असला, तरी कर्जाचे काही पैलू तुम्ही आणि तुमच्या ग्राहकांनी लक्षात ठेवले पाहिजे.

  • व्याजदर-

प्रत्येक कर्जासोबत व्याजदर असतेच. म्हणून तुम्ही किंवा तुमच्या ग्राहकांनी कर्ज उचलल्यास, उर्वरीत राशीवर व्याज द्यावा लागतो. व्याज एक अतिरिक्त खर्च आहे, जो तुम्ही किंवा तुमच्या ग्राहकांना उचलावा लागतो. वैय्यक्तिक कर्ज, स्वाभाविकरित्याच असुरक्षित असल्याने, व्याजदर जास्त असते. म्हणून तुम्ही किंवा तुमचे ग्राहक कर्ज उचलू शकता, पण व्याजापासून सावध रहा, कारण त्याचा भरणा तुमच्या खिशातून होतो. वैय्यक्तिक कर्ज, स्वाभाविकरित्याच असुरक्षित असल्याने, व्याजदर जास्त असते.

  • परतफेडीचे प्रभाव-

कर्जाची परतफेड सामान्यपणें ईएमआयच्या माध्यमातून होते, म्हणून तुम्ही किंवा तुमच्या ग्राहकांनी एखादा ईएसआयएस भरणा चुकवल्यास, विलंब शुल्क द्यावा लागतो, जो तुमच्या किंवा तुमच्या ग्राहकावर अजून एक प्रकाराचा खर्च असतो. दुसरे, क्रेडिट स्कोरची पण हानी होते. हप्ता चुकल्याने कोणाचेही क्रेडिट अंक कमी होऊ शकतात. सरतेशेवटी, निरंतर ईएसआयएस भरणा होत नसल्यास, कर्ज-दाते तुमच्या संपत्तीवर जप्ती आणण्यासाठी कायदेशीर कारवाई आरंभ करू शकतात. म्हणून तुम्ही ईएमआय समजून घेऊन आपल्या ग्राहकांना ही समजवावे लागेल.

 

थोडक्यात-

आदर्शरित्या खिशातून सर्व खर्च भागवता यायला हवेत. कर्ज घेणें टाळावे. जर तुम्ही किंवा तुमचे ग्राहक भरमसाट लग्न करू इच्छित असतील आणि वैय्यक्तिक बचत कमी असेल, तर पहिले उपलब्ध वैय्यक्तिक बचतीचा वापर करावा आणि मग वैय्यक्तिक कर्जाने उणीव भागवावी. सर्वात स्वस्त कर्ज प्रस्ताव शोधण्यासाठी विभिन्न ऋणदात्यांद्वारे दिल्या जाणार्‍या कर्ज व्याजदरांची आपापसांत तुलना करा आणि हाच सल्ला आपल्या ग्राहकांनाही द्या. लग्न कोणाच्याही जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग असतो. म्हणून, त्याला संस्मरणीय बनवता आले पाहिजे. म्हणून, तुम्हाला आणि तुमच्या ग्राहकांना कर्ज घेण्याचे निकष आणि परतफेडीच्या प्रक्रियेबद्दल माहिती असली पाहिजे. कर्ज घेण्याची गरज असल्यास, त्यांच्या कुवतीची माहिती घ्या आणि सुनिश्चित करा की भविष्यात कर्ज तुमच्यावर एखादे आर्थिक ओझे टाकणार नाही. एक भव्य लग्न करा, केवळ आपल्या खिशाला सांभाळून.

Recent articles
follow us and stay updated
[mc4wp_form id="2743"]
About TurtlemintPro
TurtlemintPro is the best insurance advisor app if you are looking to start, grow or manage your insurance business. With TurtlemintPro, you can become a trusted insurance advisor to your customers and provide great service as well. You can provide quotes from multiple insurers for multiple products, issue policy instantly without lengthy paperwork, follow-up with leads and much more.
Become a partner Become a partner