मिंट प्रो सोबत बजाज अलायन्झ विमा एजंट होण्याचे संपूर्ण मार्गदर्शक


Sign Up
/ मिंट प्रो सोबत बजाज अलायन्झ विमा एजंट होण्याचे संपूर्ण मार्गदर्शक

बजाज अलायन्झ बद्दल माहिती

विमा एजंट होऊन आपणास उत्कृष्ट भवितव्य घडवता येते कारण आपल्या सोयीनुसार काम करून आपण अत्याधिक उत्पन्न प्राप्त करू शकता. म्हणूनच अनेक लोक विमा एजन्सीसह मजबूत भविष्य घडवतात. शिवाय, बजाज अलायन्झ कंपनीही जीवन विमा आणि सामान्य विमा क्षेत्रातील बाजारामध्ये अग्रगण्य विमा कंपनी आहे. ही कंपनी ग्राहकांसाठी विविध प्रकारचे उत्पादने सादर करते. म्हणून, जर आपण बजाज अलायन्झचा एजंट होण्यास इच्छुक असाल, तर खलील अटीस पात्र असणे आवश्यक आहे.

  • आपले वय १८ वर्ष किंवा त्याहून अधिक असावे. जर आपण ५००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ठिकाणी राहत असाल, तर वर्ग १० वी उत्तीर्ण असायला हवे. आणि लोकसंख्या ५००० पेक्षा जास्त असल्यास वर्ग १२ वी उत्तीर्ण असायला हवे.
  • आपणास बजाज अलायन्झ सह अर्ज करून नोंदणी फॉर्म भरून द्यावा लागेल आणि विमा परीक्षेचे शुल्क भरावे लागतील.
  • बजाज अलायन्झने आयोजित २५ तासांचे वर्ग प्रशिक्षण घेणे आवश्यक असते.
  • प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण विमाएजंट परीक्षा देण्यास पात्र होऊ शकता.
  • ती परीक्षा नमूद केलेल्या केंद्रस्थानी ऑनलाईन स्वरूपात घेतली जाते. आपणास परीक्षेत उत्तीर्ण होण्यास किमान ४०% गुण प्राप्त करावे लागतात.
  • परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास आपणास विमा एजंटचा परवाना मिळतो व तो परवाना प्राप्त झाल्याने, बजाज अलायन्झचा एजंट होऊन त्यांच्या पॉलिसी ग्राहकांना विकण्यास आपणास परवानगी मिळते.

तो परवाना प्राप्त झाल्याने, बजाज अलायन्झचा एजंट होऊन त्यांच्या पॉलिसी ग्राहकांना विकण्यास आपणास परवानगी मिळते.

बजाज अलायन्झचा एजंट होण्याचा सोपा मार्ग

बजाज अलायन्झचाएजंट होण्याचा एक सोपा मार्ग आहे. मिंटप्रोआपणास पॉईंट ऑफ सेल पर्सन (पी.ओ.एस.पी)होऊन बजाज अलायन्झ तसेच इतर जीवन विमा कंपन्यांचे विमा पॉलिसी विकण्याची परवानगी देते. जेव्हा आपण पॉईंट ऑफ सेल पर्सन(पी.ओ.एस.पी) बनता, तेव्हा आपण सामान्य विमा पॉलिसी देखील विकू शकता. म्हणून बजाज अलायन्झचा एजंट असल्याने केवळ बजाज अलायन्झच्या योजनांची विक्री करता येते, तर मिंटप्रोचा पॉईंट ऑफ सेल पर्सन (पी.ओ.एस.पी) होऊन आपणास विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री करण्याची परवानगी मिळते.

  • वय कमीत कमी १८ वर्ष असावे.
  • वर्ग १० वी उत्तीर्ण असावे.
  • मिंट प्रो सह नोंदणी करावी.
  • मिंटप्रो द्वारा विकसित केलेल्या ऑनलाइन व्हिडिओंच्या माध्यमातून ५ तासांचे ऑनलाइन प्रशिक्षण घ्यावे. आपल्या फोन किंवा संगणकाद्वारे हे प्रशिक्षण घेता येते.आपणास कोणत्याही वर्ग प्रशिक्षणास उपस्थित राहण्याची गरज नाही.
  • आपल्या घरातून किंवा ऑफिसमधून ऑनलाइन परीक्षेस उपस्थित राहूशकता. परीक्षा सोपी आणि छोटीअसते.
  • पॉईंट ऑफ सेल पर्सन (पी.ओ.एस.पी) होऊन परवाना मिळविण्यासाठी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे.

परवाना मिळाल्या नंतर आपण बजाज अलायन्झ तसेच इतर कंपन्यांच्या विमा योजना सहजपणे ऑनलाईन विक्री करू शकता. मिंट प्रो विमा पॉलिसी विक्रीमध्ये आपणास पूर्ण पणे पाठिंबा देते.

वर्गप्रशिक्षण घेण्याची गरज नसल्याने आणि आपल्या सोयीनुसार ऑनलाइन प्रशिक्षण घेणे शक्य असल्याने विमा योजना विक्रीसाठी पॉईंट ऑफ सेल पर्सन (पी.ओ.एस.पी) बनने सोपे आहे. शिवाय, पॉईंट ऑफ सेल पर्सन (पी.ओ.एस.पी) परीक्षेचा अभ्यासक्रम मिंट प्रो ने प्रदान केलेल्या ऑनलाइन व्हिडिओ द्वारे समजून घेणे सोपे आणि सुलभ आहे.

म्हणून, जर विमा योजनांची विक्री करणे ह्या मध्ये आपणास भविष्य घडवायचे असेल तर मग पॉईंट ऑफ सेल पर्सन (पी.ओ.एस.पी) होऊन बजाज अलायन्झ आणि इतर जीवन विमा कंपन्यांचे देखील पॉलिसीची विक्री करू शकता.

वाचा मी विमा योजनांची विक्री करून किती पैसे कमवू शकेल?